शेवटी काय..

सूर्य उगतो दिवस उजळतो आयुष्य राहते तसे चालतच सूर्य मावळतो दिवस संपतो शेवटी काय एकूण एकच ।।ध्रु।। ढग येतात पाऊस येतो नभ दाटते दररोजच पाऊस थांबतो ऊन येते शेवटी काय एकूण एकच ।। १।। जन्म होतो रांगु लागतो धुडगूस घालतो घरभरच पडतो उठतो उभे राहतो शेवटी काय एकूण एकच ।।२।। शिक्षण घेतो पुस्तके वाचतो ज्ञानचक्षु तेव्हा उघडतातच वस्तुस्थिती बघता मग शेवटी काय एकूण एकच ।।३।। शिक्षण होते नोकरी लागते घर बांधतो गाडी घेतो पैसे येतात पैसे जातात शेवटी काय एकूण एकच ।।४।। लग्न होते मुले होतात मोठे होतात उडून जातात एकटेची आपण राहतो शेवटी काय एकूण एकच ।।५।। मागची पिढी पुढची पिढी वर्तमान हा कुणा साठी? अपेक्षांचे वजन माथी शेवटी काय एकूण एकच ।।६।। संकटे येतात संकटे जातात आयुष्य जाते लढण्यातच जमाखर्च मांडता कळते शेवटी काय एकूण एकच ।।७।। लक्ष्य नेहमी पुढे धावते खरी मजा प्रवासात येते लक्ष्यासाठी प्रवास विसरता शेवटी काय एकूण एकच ।।८।। -बेशब्द.. १७ फेब्रुवारी २०२५