आम्ही वारकरी

आले बघा बोलावणे, आता नाही थांबणे। धरावीया तव चरणे, आम्ही वारकरी।।ध्रु।। पंढरीचे आकर्षण, तुझ्या चरणांचे दर्शन। भक्ती पंथाचे आचरण, आम्ही वारकरी।। १।। संकटांचे निर्मूलन, शत्रूचे निर्दालन। सीमांचे संरक्षण,आम्ही वारकरी।।२।। #military जमिनीचे नांगरण, पिकांचे संवर्धन। सकलांचे पोषण, आम्ही वारकरी।।३।। #farmer नियम निर्धारण, साधनांचे नियोजन। देशाचे दिग्दर्शन, आम्ही वारकरी।।४।। # politician कायद्यांचे प्रतिपालन, नीर क्षीर विवेचन । रामशास्त्रीचे वंशज, आम्ही वारकरी।।५।। # judiciary सुविधांचे परिपालन, योजनांचे वितरण। धोरणांचे अंमलदार, आम्ही वारकरी ।।६।। #admininistration सद् रक्षणाय कटिबद्ध, सुव्यवस्थेचे नियंत्रण। खलनिग्रहणाय दक्ष, आम्ही वारकरी ।।७।। #police बालमनांचे संगोपन, युवा मनाचे विस्तारण। ज्ञानप्रसाराचे साधन, आम्ही वारकरी।।८।। # teacher जटिल रोगांचे निदान, आयुष्यवृद्धी प्रयोजन। यमाशी करतो भांडण, आम्ही वारकरी।।९।। #doctor नव प्रक्रियांचे संशोधन, सद्य वस्तूंचे सुधारण। आहे नाविन्याचा ध्यास, आम्ही वारकरी।।१०।। #researchers सुई पासून रणगाडा पर्यंत, करी सर्वच गोष्टींचे उत्पादन। औद्योगिक विकास प्रवर्तक, आम्ही वारकरी ।।११ ।। #entrepreneurs जिव्हा लालसेची पूर्ती, देतो स्वादिष्ट व्यंजन। क्षुधाशांती मनःशांती, आम्ही वारकरी।।१२।। #restaurant ठेवतो हिशोब साऱ्यांचा, जोडूनिया उत्तम धन। वैभवलक्ष्मी चे सेवक, आम्ही वारकरी।।१३।। # finance करी राष्ट्रध्वज उत्तुंग, गाजवून क्रीडांगण। जिंकुनी क्रीडा समर, आम्ही वारकरी।।१४।। #Sportperson संगणक शास्त्राचे मांत्रिक, आहे तंत्रज्ञानाचे वरदान। जगाशी करवतो संभाषण, आम्ही वारकरी।।१५।। #it चित्र नाट्य शिल्प लेखन, नृत्य गायन वादन कीर्तन। मनोरंजन प्रबोधन कार्य, आम्ही वारकरी।।१६।। # artist आगमन आणि निर्गमन, रस्त्यावर आमचे संचारण। चीजवस्तु माणसांचे वहन, आम्ही वारकरी ।।१७।। # transportation चालवतो यंत्रे, वापरूनी तंत्रे, आकारण,संवर्धन विनाशन। अंग मेहनत करतो खूप, आम्ही वारकरी।।१८।। # assistant labour worker काहींचा देव वसतो पंढरीत, काहींचा देव त्यांचे कर्मन्। कर्तव्य करतात जे परिपूर्ण, ते सगळेच वारकरी।।१९।। -बेशब्द.. १६ जुलै २०२४